shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव पोलीस स्टेशन कोरोना कंटेन्मेट झोन म्हणुन घोषीत, कारभार नर्सि (नामदेव) पो.स्टे.कडे..!!


हिंगोली । प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख)➤
दि.२०,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव पोलीस स्टेशनचे एक पोलीस अधिकारी कोरोना बाधीत झाल्याचा अहवाल आज दि.२० आँगस्ट गुरुवार रोजी प्राप्त झाल्याने सेनगांव पोलीस स्टेशन निर्जतुंकीकरण करण्यात आले असून पोलीस स्टेशन कोरोना कंटेन्मेट झोन घोषीत करण्यात आल्याने शिल करण्यात आले असून आता सेनगांव पोलीस स्टेशनचा कारभार नर्सि(नामदेव)येथुन पाहीला जाणार आहे.



सेनगांव पोलीस स्टेशनचे एक पोलीस अधिकारी कोरोना पाँझिटीव्ह आल्याची माहीती पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांनी हिंगोली पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांना कळविले आहे आणि संबधीत कोरोना बाधीत अधिकाऱ्याच्या संपर्कात असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. तसेच पोलीस स्टेशनचे कामकाज बंद करुन शिल करण्यात आले आहे.

सेनगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ६४ गावच्या नागरिकांना तक्रार व पोलीस स्टेशनच्या कामासाठी आता नर्सि (नामदेव) पोलीस स्टेशनला जावे लागणार आहे. सेनगांव पोलीस स्टेशनचे कामकाज पुढील किमान पाच ते सहा दिवस बंद राहाण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांनी शिर्डी एक्सप्रेस न्युजशी बोलतांना दिली.
close