केज | प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) : -
बीड शहरातील ५, परळी शहरातील ५, धारुर २, केज २ व अंबाजोगाई शहरात १ यासह गेवराई, वडवणी , केज, बीड आणि शिरूर तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यात २० ठिकाणी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असल्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी प्रवीणकुमार धरमकर यांनी दिले आहेत. या परिसरामध्ये फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) नुसार अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
बीड शहरातील , परळी शहरात परमार कॉलनी, इरिगेशन कॉलनी , जुने रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर व भिम वाडी, धारुर शहरात उदय नगर व पोस्ट ऑफिस जवळ( हनुमान गल्ली) ,केज शहरातील अजीजपुरा व व मंगळवार पेठ कॉर्नर, अंबाजोगाई शहरातील दुर्गा नगर या शहरी भागात
तसेच वडवणी तालुक्यातील मौजे पिंपळा, गेवराई तालुक्यातील मौजे बेलगाव, शिरूर तालुक्यातील मौजे दहिवंडी येथील उत्तम नगर , केज तालुक्यातील ढाकेफळ व बीड तालुक्यातील काटेवाडा या संबंधीत परिसरात आणि गावात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे.त्यामुळे तालुक्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात ३१ ऑगस्ट २०२० रोजी रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ (१) (३) लागू करण्यात आले आहेत.