प्रतिनिधी । जुन्नर :
दिनांक 20 ऑगस्ट रोजी वाजता ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ,आळे,संतवाडी, कोळवाडी या संस्थेचे अध्यक्ष व ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय भाऊदादा कुऱ्हाडे यांच्या हस्ते Yes You Can या You Tube चॅनलचे उदघाटन झाले.इंग्रजीची भीती दूर करणे आणि तो विषय सध्या, सोप्या पद्धतीने सर्वांना मराठीतून शिकविणे हा या चॅनलचा उद्देश आहे.
ज्यांना इंग्रजी भाषा ही जीवनातील यशाची शिडी बनवायची आहे त्यांनी वरील लिंकवर क्लिक करा.
चॅनल सर्वांसाठी मोफत असून 8 वर्षांपुढील कोणीही विद्यार्थी, शिक्षक, पालक,गृहिणी, पत्रकार,व्यावसायिक इ. या चॅनलच्या माध्यमातून शिकू शकतात.सर्वांना रोज एक नवीन व्हिडीओ या चॅनल वर पहायला मिळेल.
चॅनल सर्वांसाठी मोफत असून 8 वर्षांपुढील कोणीही विद्यार्थी, शिक्षक, पालक,गृहिणी, पत्रकार,व्यावसायिक इ. या चॅनलच्या माध्यमातून शिकू शकतात.सर्वांना रोज एक नवीन व्हिडीओ या चॅनल वर पहायला मिळेल.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष भाउदादा कुऱ्हाडे,मानद सचिव बाळासाहेब गुंजाळ, खजिनदार रोहिदासशेठ पाडेकर संचालक माऊली शेठ कुऱ्हाडे,अरुणशेठ हुलवळे,प्रसन्ना, अण्णा डोके,संपतशेठ गुंजाळ,किशोरशेठ कुऱ्हाडे,राजूशेठ कुऱ्हाडे, अर्जुनशेठ पाडेकर, बबनराव सहाणे, समन्वयक डी. के. गुंजाळ सर,प्राचार्य चासकर सर,उपप्रचार्य कोते सर,रचना कुऱ्हाडे मॅडम, डावखर मॅडम इ. उपस्थित होते.
प्रणव काळे सरांनी सूत्रसंचालन , मिरे सरांनी प्रस्तावना आणि कापसे सरांनी चॅनलचे संकल्पना व उद्देश सांगितले.आभार प्रदर्शन डी के गुंजाळ सरांनी केले.
20 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असलेले प्रा.अमोल कापसे हे या चॅनलचे ट्रेनर आहेत तर प्रा.मयूर मिरे आणि कुणाल कुऱ्हे यांनी व्हिडीओ एडिटिंग केलेले आहे.

