shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विड्याच्या महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखेने 878 शेतकर्यांना 4 कोटी 75 लाख रुपयांच्या पीक कर्जाचे केले वाटप..!!



शाखाधिकारी तौशिफ शेख यांची कौतुकास्पद कामगिरी ....!! 


केज तालुका । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) ➤
महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या विडा शाखेच्या अंतर्गत गावातील 878 शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी तब्बल 4 कोटी 75 लाख रुपयांचे पिक कर्ज वाटप करून शाखाधिकारी तोसिफ शेख यांनी कौतुकास्पद कामगिरी केली  आहे.



गेल्या तीन महिन्यापूर्वी मी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या विडा शाखेत रूजू झाल्यापासून आजतागायत अंतर्गत गावातील 878 शेतकर्यांना तब्बल 4 कोटी 75 लाख रुपयांचे पिककर्ज वाटप केले आसून याचे मला समाधान आहे.
                   - तौसिफ शेख
               (शाखाधिकारी वीडा)

शेतकर्यांकडे खरीप हंगामातील पेरणीसाठी पैसे नसल्याने बीड जिल्ह्यातील शेतकर्यांनी पिक कर्जासाठी विविध बॅंकेकडे अर्ज दाखल केले होते.परंतू जिल्ह्यातील कित्येक बँकेच्या अधिकार्यांनी शेतकर्यांना पिक कर्ज देण्यासाठी असमर्थता दर्शवली होती.मागील काही दिवसापूर्वी तर शेतकर्यांना पिककर्ज देण्यासाठी असमर्थता दर्शवलेल्या एका बॅंक मॅनेजरचे चक्क पाय धुवून एका बड्या राजकीय नेत्याने आनोखे आंदोलन देखिल केले होते.
दरम्यान केज तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या विडा शाखेने अंतर्गत  गावातील 878 शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी तब्बल 4 कोटी 75 लाख रुपयांचे पिक कर्ज वाटप करत महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या विडा शाखेचे कर्तव्यदक्ष शाखाधिकारी तौसिफ शेख    यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.त्यामुळे अंतर्गत गावातील शेतकर्यांकडुन बॅंकेच्या अधिकार्यांचे कौतुक केले जात असून समाधान व्यक्त केले जात आहे.

     

close