shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग..!!

केज तालुका । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) ➤ 
केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे अल्पवयीन मुलीचा बाजरीच्या शेतात विनयभंग केल्याची घटना घडली आहे.



या बाबतची माहिती अशी की, दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी एक अल्पवयीन मुलगी ही शौचास गेली असता गावातील महादेव नागनाथ कांदे याने तिच्याशी लगट करून तिचा विनयभंग केला. त्या नंतर पीडितेने आरडाओरड केली असता तिला आरोपी महादे नागनाथ कांदे व हनुमंत बापु कांदे यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच या बाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने दि.१४ सप्टेंबर रोजी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून महादे नागनाथ कांदे आणि हनुमंत बापु कांदे यांच्या विरुद्ध गु.र.नं. ४७०/२०२० भा.दं.वि. ३५४(अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ आणि बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.
close