(त्या जागेवर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे सभागृह बांधण्याची मागणी)
हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१४,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील पोलीस स्टेशनला तुकाराम फटांगळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून तो मागे घेऊन त्या गावठाण जागेवर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे सभागृह बांधण्याच्या मागणीचे निवेदन आज दि.१४ सप्टेंबर सोमवार रोजी हिंगोली जिल्हाधिकारी यांना माळी समाज व धनगर समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.
सेनगांव येथील तेली समाज हे गावठाणातील धार्मिक स्थळाजवळ स्मशानभूमी असल्याबाबत चुकीची दिशाभूल करुन नगरपंचायत,तहसिलदार,पोलीस स्टेशन यांना खोटी माहीती देत आहेत.खरे पाहाता तर तेली समाजाची स्मशानभूमी सेनगांव ते आजेगाव रोडच्या बाजुला पुलाजवळ असल्याचे वयस्कर व्यक्ती सांगतात.तेली समाज नविन स्मशानभूमी निर्माण करण्याच्या मानसिक तयारीत आहेत यापुर्वी सेनगांव गावठाणच्या या जागेत समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले सभागृह बांधण्या करीता जागा मिळावी यासाठी दि.३०/०१/२०१९ रोजी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे माळी समाज व धनगर समाज यांच्यावतीने निवेदन देण्यात आले होते.त्या अनुषंगाने हिंगोली निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांना दि.०५/०२/२०१९ रोजी सेनगांव तहसिलदार साहेब यांना पत्रव्यवहार करुन योग्य ती चौकशी करुन कार्यवाही करावे असे कळविले होते.तरी माळी समाज व धनगर समाजाच्या वतीने नम्र विनंती आहे की,या मोकळ्या जागेवर हेतु पुरस्कर ताबा करुन स्मशानभूमी मिळविण्यासाठी तेली समाजाचा आटापिटा चाललेला आहे.वेळीच दखल घेऊन संबधीत तेली समाजातील काही पुढारी मंडळी ही शासनाची दिशाभुल करुन प्रशासनाची जागा जे की समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सभागृभासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे.त्यावर कोणत्याही तेली समाजास प्राधान्य देण्यात येऊ नये तसेच गावठाण जागेवर अनाधिकृत व गैरकायदेशीर स्मशानभूमीची जागा असल्याबाबत चुकीची संकल्पना मनाशी बाळगुन खोटा गुन्हा दाखल केला तो मागे घेण्याच्या मागणीसाठी माळी समाज व धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे तरी मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी या निवेदनाचे गांभिर्याने विचार करुन संबंधित जागे विषयी वाद निर्माण होऊ नये म्हणून वेळीच दखल घेऊन पुर्वीच्या निवेदनानुसार समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सभागृहा करीता जागा कायम ठेवण्यात यावी. या निवेदनावर सेनगांव तालुका राजे मल्हार संघटनेचे अध्यक्ष गंगारामजी सखारामजी फटांगळे,तुकारामजी फटांगळे,संभाजी बोरकर,गजानन फटागंळे,शिवाजी फटागंळे,माणिक राऊत,लिलाबाई राऊत,शेख बाखर,शेख मुनीर,रामदास फटागंळे,देवेंद्र उखळकर,निवृत्ती फटागंळे,गोविंदा फटागंळे,कुंडलीकराव फटागंळे,रामराव धोतरे,निर्मला धोतरे,प्रभाकर धोतरे,अनिता धोतरे,गोपाल पवार,रामजी फटागंळे,गजानन बोरकर,रामदास बोरकर,भगवान बोरकर आदीसह १०० नागरीकांच्या स्वाक्ष-या आहेत.

