इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤
बाभूळगाव देि.१४/०९/२०२० रोजी
रा.स्व.संघ जनकल्याण समीती बारामती रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष काढा गोळी 1 पॉकेट मध्ये 60 गोळी आहेत हे असे 30 पॉकेट 30 कुटुंबासाठी आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाय माहिती परिपत्रक हे रा.स्व.संघ जनकल्याण समीती बारामती यांच्या वतीने विना शुल्क वाटप करण्यात आले .
तसेच कुटूंब प्रमुखाचे पल्स आॅसिमिटर ने sp02 आणि PRbpm शशरीरातील तपासणी करून प्रतेक व्यतिस एक मास्क वाटप करण्यात आले. आणि
भाजप युवा नेते अमोलराजे इंगळे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय विषयी माहिती दिली.
यावेळी डॉ. ज्योती (ताई) जाधव 30 कुटुंबातील काही महिला व पुरूषांची तपासणी करण्यात आली.
डॉ.ज्योती ताई जाधव यांचा बाभुळगावचे कोरोना योद्धे म्हणून सन्मान करण्यात आला .
यावेळी मा.ग्रा.प.सदस्य नागराज गुरगुडे, नारायण आसबे, दत्तात्रय जाधव, महाविर आसबे, रमेश इंगळे आदी उपस्थित होते. हा सर्व कार्यक्रम शासन नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्यात आला

