चाळीसगाव :- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज मा. तहसीलदार साहेब चाळीसगाव यांना अती पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे जे नुकसान झाले आहे
.
त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कारण या जगाचा पोशिंदाला जर न्याय मिळत नाही व ते शेतकरी बांधव आपला हक्क मागण्यांसाठी वारंवार तलाठी कार्यालयात जातात पण तिथे त्यांना एकच उत्तर दिले जाते ते म्हणजे आम्हाला अजुन कृषी विभागाकडून पाहणी आदेश आलेले नाही.
शेतकरी बांधवाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी मुलांच्या शिक्षणासाठी सावकाराकडून शेतीचे उत्पन्न निघेपर्यंत कर्ज घेतलेल आहे. पण अतिपावसामुळे यावर्षी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन त्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी..तसेच तालुक्यातील कृषी अधिकारी व तलाठी यांनी अजुन नुकसानीची पाहणी केली नाही व ती पाहणी करून झालेली नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.....यावेळी तेथे उपस्थित चाळीसगाव ता. अध्यक्ष राकेश नवगिरे ता. उपाध्यक्ष कौस्तुभ मोरे ता.शाखा प्रमुख मंगलसिंग राजपूत ता. संपर्क प्रमुख तुषार मोरे शहर चिटणीस ईश्वर पवार आदी उपस्थित होते.

