shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोहा ,कंधार मतदार संघातील अतिवृष्टी बाधित शेतीचे पंचनामे करण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..!!



आमदार शामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नाला यश

लोहा, कंधार( प्रतिनिधी )
मागील काही दिवसात लोहा कंधार तालुक्यात जास्तीचा पाऊस होऊन ज्वारी, सोयाबीन, ऊस ,मुग, उडीद ,कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने लोहा ,कंधार तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित पिकांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लोहा, कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष ,आमदार शामसुंदर शिंदे यांनी वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी पाठपुरावा केलेला होता,. काल गुरुवारी लोहा, कंधार मतदारसंघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्याशी दूरध्वनीवरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व शेतीचे पंचनामे करण्यासाठी सविस्तर चर्चा केली होती.

काल गुरुवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी परदेशी यांची आमदार शामसुंदर शिंदे यांनी दुपारी त्यांच्या दालनात भेट घेऊन लोहा ,कंधार तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे आमदार शिंदे यांनी केली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी परदेशी यांच्याशी पंचनामे करण्यासंदर्भात सखोल चर्चा करून अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ द्या .

अशी मागणी आमदार शामसुंदर शिंदे यांनी लावून धरताच  काल गुरुवारी नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी परदेशी यांनी लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार चे तहसीलदार मांडणगावे यांना लोहा ,कंधार तालुक्यातील अतिवृष्टीने व वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या  ज्वारी, सोयाबीन ,ऊस, सोयाबीन,मूग उडीद, आदी  बाधित पिकांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी परदेशी यांनी प्रशासनाला दिले असून वेळोवेळी तळमळीने लोहा ,कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहून व शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाविषयी आमदार शामसुंदर शिंदे यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून ,लोहा ,कंधार तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्‍यात आनंद व्यक्त होत असून ,आमदार शामसुंदर शिंदे यांचे लोहा ,कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांतून अभिनंदन होत आहे.
close