इंदापूर प्रतिनिधी तात्याराम पवार
वडापुरी दि १/९/२०२० रोजी बाल गणेश विठ्ठल मित्र मंडळ वडापुरी येथील मुलांनी गावातील घराघरातील गणपती एकत्र करून गावातील तळ्यात विसर्जन केले
बाल गणेश विठ्ठल मित्र मंडळ हे लहान मुलांनी एकत्र येऊन केलेले मंडळ आहे प्रत्येक वर्षी या मंडळाच्या वतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम बाल संस्कार कार्यक्रम घेतले जात असतात परंतु या वर्षी जागतिक कोरोनाविषाणू च्या संकटामुळे यावर्षी कोणतेही कार्यक्रम न घेता शासनाच्या नियमाचे पालन करून व आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन केलेले कार्य ग्रामस्थांच्या समोर एक संस्काराचाआदर्श मांडलेला आहे आज विसर्जन मिरवणुकीच्या वेळी गावातील घरोघरी चे गणपती एका गाड्यांमध्ये एकत्र करून सोशल डिस्टंसिंग व तोंडाला मास्क लावून या बाल गणेश विठ्ठल मित्र मंडळ यांनी गावाशेजारील तळ्यामध्ये सर्व गणपती गाड्यावर घेऊन जाऊन विसर्जित केले यावेळी बाल गणेश विठ्ठल मित्र मंडळाचे काही ठराविक सात ते आठ मुलांनी उपस्थित राहून विसर्जित केले आज त्यांच्या कार्याचे कौतुक ग्रामस्थांच्या वतीने केले जात आहे

