सावळीविहीर(प्रतिनिधी):
राहाता तालुक्यात कोव्हीड१९ या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे तालुक्यातील विविध गावात कोरोनाच्या रॅपिड टेस्ट घेण्यात येत आहेत. आज मंगळवार दि, 1 सप्टेंबर रोजी राहाता तालुक्यात दिवसभरात ठिक ठिकाणी रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या.
त्यापैकी एकुण 9 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.तर शिर्डीत आत्तापर्यंत 286 व्यक्ती कोरोना बाधित झालेल्या असून त्यामध्ये 264 व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेले आहेत.तर एक जण कोरेणामुळे मयत झाला असून सध्या 21f व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.अशी माहिती देत अनलॉक 4 मध्येही नागरिकांनी अटी व शर्ती ठेवूनच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
राहाता तालुक्यात दररोज कोरोनाच्या रॅपिड टेस्ट वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची तपासणी झटपट होत आहे व कोरोना बाधित रुग्ण त्वरित आढळून येत असून आज राहता तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 9कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.या 9 कोरोना बाधित रुग्णांमध्ये निमगाव निघोज येथे 4 कोरोणा बाधित रुग्ण आढळून आले तर शिर्डी ,राहता, राजुरी, पिंपरी निर्मळ, लोणी खु,येथे प्रत्येकी 1कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे.असे एकूण 9 कोरोना बाधित रुग्ण आज _ दिनांक 1 सप्टेंबर मंगळवार रोजी नव्याने आढळून आले असल्याची माहिती राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.
तसेच शिर्डीमध्ये आत्तापर्यंत 286 व्यक्ती कोरोना बाधित झाल्या असून त्यामध्ये एक व्यक्ती मयत झाली आहे तर 264 व्यक्ती बरी होऊन घरी गेले असून सध्या 21 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी देत, दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संदर्भात अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे तसेच सामाजिक दुरी, मास्क वापरणे.या गोष्टी नागरिकांनी करणे गरजेचे आहे. तसेच 1 सप्टेंबर पासून अनलॉक 4मध्येही नागरिकांनी अटी व शर्ती ठेवून ,कायदा,नियम पाळत प्रशासनाला सहकार्य करावे.
जरी काही नियम शिथिल करण्यात आले असले तरी काही अटी व शर्ती व 144 कलम जिल्ह्यात जारी आहे. हे पण प्रत्येक नागरिकांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत कुठेही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये .विनाकारण कुठेही गर्दी करू नये. कामा निमित्तच बाहेर पडावे. असेही आवाहन राहाता तहसीलदार व इन्सिडेंट अधिकारी कुंदन हिरे यांनी केले आहे.

