shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्ञानीभक्त कसा असतो....!!

एका माणसाने बाजारातुन आपल्या मुलांसाठी चार लाडू आणले.
लाडू पारदर्शक पिशवीत आणल्यामुळे बाहेरून दिसत होते.
तो मनुष्य आपल्या घरी आला तेव्हा त्याचे चारही मुले अंगणात खेळत होती.
मुलांनी त्या पारदर्शक पिशवीतून आणलेले लाडू पाहिले.
सर्वात पहिले लहान मुलगा वडीलांजवळ येऊन मला लाडू पाहिजे म्हणून रडू लागला.
त्यास वडीलांनी एक लाडू दिला.
नबंर दोनच्या मुलाने जबरदस्ती करत आपल्या वडीलांकडून एक लाडू मागुन घेतला. तिसरा मुलगा थोडा शहाणा होता.
तो लाडूसाठी रडलाही नाही व वडीलांकडे लाडूही मागितला नाही.
फक्त आशेने लाडूकडे बघत राहीला.
वडीलांनी त्यालाही एक लाडू दिला.
पण चौथा मुलगा मात्र आपल्या मस्तीत खेळत राहीला.
त्याने लाडूकडे लक्षही दिले नाही,लाडू मागितलाही नाही.
आणि रडलाही नाही.
वड़िलांनी तो जिथे खेळत होता तिथे जाऊन त्याला लाड़ू दिला.
वड़िलांनी आपल्या चारही मुलांसाठी लाड़ू आणले होते.
परंतू प्रत्येकाची पात्रता वेगवेगळी होती, रडणारा आर्त भक्त असतो,
मागणारा अर्थार्थी भक्त असतो,
पाहणारा जिज्ञासु भक्त असतो,
व आपल्या मस्तीत राहणारा ज्ञानीभक्त असतो व देव ही अश्या भक्ताकडे स्वतः जातो आणि असा भक्त देवासही आवडतो.
             ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज मोहिते
                       आळंदी देवाची
             🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
close