मराठा सेवा संघाच्या 30 व्या वर्धापन दिननिमित्ताने राज्यात मानवंदना कार्यक़्रमाचे आयोजन..!!
(जळगाव जिल्हा प्रतनिधी / श्री. प्रमोद चौधरी)
एरंडोल - मराठा सेवा संघाच्या 30 व्या वर्धापन दिननिमित्ताने जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रतर्फे राज्यात फेसबुक लाईव्ह मानवंदना कार्यक़्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राज्यात ठिकठिकाणी फेसबुक लाईव्ह कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
जळगांव जिल्ह्यात एरंडोलला जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचा दि. 3 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 2 ते 3 दरम्यान सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिजाऊ पुजन, जिजाऊ वंदना, मान्यवरांचा सत्कार, मान्यवरांचे मनोगत आणि जिजाऊ ब्रिगेडचा हळदीकुंकू-तिळगुळ कार्यक्रम आणि शिवछत्रपतींवर पोवाडा सादर करण्यात आला. महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा माधुरीताई भदाणेंच्या संकल्पनेतून आणि संस्थापक अध्यक्ष युगपुरूष पुरूषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाने सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझेशन या त्रिसूत्रीचा वापर करून सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. सदरप्रसंगी एरंडोल तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तथा राज्य आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर, संभाजी ब्रिगेडचे रवींद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार तथा ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. शिवाजीराव अहिरराव, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदचे राकेश पाटील यांनी मराठा सेवा संघाची वाटचाल, उपक्रम, अपेक्षा याबाबत मार्गदर्शन केले तर अजय राजपूत या तरूणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला.
सुरूवातीस दीपप्रज्वलन, राजमाता जिजाऊ पुजन आणि जिजाऊ वंदना सादर केली. विधवा महिलांना देखील हळदीकुंकू, तिळगुळ कार्यक़्रमात सहभागी होणेसाठी मराठा समाजाने जागृती करणे गरजेचे आहे याबाबत नाटीका सादर करण्यात आली. यासाठी जळगांव जिल्हा जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा मनिषा पाटील, सदस्या तथा राजमाता जिजाऊ महिला मंडळ अध्यक्षा शकुंतला अहिरराव, कल्पना लोहार, रजनी काळे, भारती वारूळे, सुजाता पाटील, सुरेखा पाटील यांनी सादरीकरण केले. कार्यक्रमासाठी फेसबुक लाईव्ह डॉ. मीना काळे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक, सुत्रसंचलन, आभार मनिषा पाटील यांनी प्रभावीपणे केले. कार्यक़्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. बालाजी पवार, प्रा. डॉ. मीना काळे यांनी परीश्रम घेतले.

