shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुंबई लोकल ट्रेन कधी चालू होणार..? एक ञस्त मुंबईकर..!!


मुरूड प्रतिनिधी । विकास मेहेतर: 
सध्या सर्वसामान्य जनतेचा जगण्या- मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, Lockdown मध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कपात झाली काहींना तर कंपनी मुलीचं पागर देत नाही असे असताना आत्ता बऱ्याच लोकांना कामावर जाणे शक्य होत नाही आहे.
कारण प्रत्येकाचे गृहकर्ज आणि इतर कर्ज तसेच कुटुंबाची असणारी खर्चाची जबाबदारी या सगळ्या गोष्टी असताना प्रत्येकाला कामावर किंवा आपल्या उद्योग धंद्याच्या ठिकाणी जाणे गरजेचे आहे, कारण सर्वसामान्य जनतेच्या जगण्याच्या प्रश्न आहे, अश्या परिस्थिती मध्ये लोकल सेवा चालू नसल्याने दिवा, डोंबिवली, कल्याण कर्जत, खोपोली, कसारा, विरार, कल्याण डोंबिवली आणि इतर शहरांमधून मुंबई मध्ये जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा मध्ये नोकरी करणाऱ्या प्रवेश लोकल मध्ये प्रवेश आणि सामान्य माणसाने कसे जीवन जगावे.

त्यांना ट्रेन मध्ये प्रवेश का नाही  अश्या परिस्थितीत शेवटी पर्यायाने रस्ते वाहतूक मार्ग निवडून रस्त्यावरील खड्यामधून, प्रचंड ट्राफिक मधून आणि रोजचा 150/200 रूपये खर्च करून, आणि खूप मोठी जोखीम पत्करून कामाच्या ठिकाणी पोहचावे लागते आहे, तरी शासनाने या परिस्थीचा गंभीर विचार करून लोकल सेवा सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा चालू करावी , ही विनंती.
 आपला त्रस्त झालेला एक मुबंई कर नागरिक.
close