पाटण | प्रतिनिधी महेश मस्कर
चिपळुणची सुरमई अशी ओळख असणारी मराठमोळी अभिनेत्री डान्सर श्रुती भालेकर हिने अप्सरा आली तसेच तारा फ्रॉम सातारा या रियालिटी शो मधुन तिला संपुर्ण महाराष्ट्राने पाहीली आहे.ती स्वत: डान्स सोबतच "कोरीओग्राफी" पण अतिशय चांगल्या प्रकारे करते.
आपल्या अथांग परिश्रम, जिद्द ,चिकाटी यांच्या जोरावर फ्लीपकार्ट व्हीडीओ प्रस्तुत "द ग्रेट इंडीया डांन्स ऑफ" या नव्या कोर्या रियालिटी शो मध्ये सहभागी झाली आहे.अतिशय चांगल्या प्रकारे आपली कला सादर करत आहे. तसेच या रियालिटी शो मध्ये श्रृती भालेकर ही एकमेव मराठी मुलगी आहे जी आपल्या मराठमोळ्या अदाकारीने "द ग्रेट इंडीया डांन्स ऑफ" चा मंच गाजवत आहे.
त्याचबरोबर तिने वाट्सॲप,, इन्स्टाग्राम ,फेसबुक च्या माध्यमातुन जनतेसोबत संवाद साधुन फ्लीपकार्ड ॲप द्वारे वोट करण्याचे आवाहन केले.

