shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिव्यांग असूनही तीन चाकी रिक्षा वर केला वडापावचा गाडा... नेता जनसामान्यांचा श्री.अमोल राजे इंगळे यांनी केले उद्घाटन..!!

इंदापूर प्रतिनिधी /तात्याराम पवार
बाभूळगाव देि.५/९/२०२० रोजी श्री बळीराम रामभाऊ साळुंखे राहणार बाभूळगाव यांनी दोन्ही पाय दिव्यांग असतानाही जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर चालता-फिरता तीन चाकी रिक्षा वर  वडापावचा गाडा तयार केला असून आज रोजी बाभूळगाव चे नेता जनसामान्यांचा श्री अमोल राजे इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी अमोल राजे म्हणाले की सुवर्ण युगातील मराठी पाऊल पडते पुढे यानुसार सुशिक्षित तरुणांनी नोकर होण्यापेक्षा उद्योजक बनावे व आपले आयुष्य फुलासारखे फुलवावे साळुंखे यांनी आपले दोन्ही पाय निकामी झाल्याने त्यांनी आपला प्रपंच चालवण्यासाठी तीन चाकी रिक्षा चे  फिरता वडापाव चा गाडा तयार करून ग्रामीण भागातही व्यवसाय कसा करायचा याचा अनोखा आदर्श मांडलेला आहे त्यांच्या या व्यवसायाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 
यावेळी सदर कार्यक्रमास प्रगतशील बागायतदार श्री.श्रीमंत चव्हाण पै सचिन बाळासो गुरगुडे रमेश सदाशिव गुरगुडे चंद्रकांत मिसाळ ओमकार गुरगुडे ( छायाचित्रकार) ओम साळुंखे बाळासो गुरगुडे प्रथमेश गुरगुडे गणेश तरंगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


close