shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गडचिरोली : दारु विक्रेत्यांचा ८७ पोते मोहसडवा व साहित्य नष्ट..!!

गडचिरोली ता.२०:- तालुक्यातील काटली-मोहझरी जंगल परिसरात दारु विक्रेते भट्या लावून दारुविक्री करीत आहेत. त्यामुळे काटली येथील गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून जवळपास ८७ पोते मोहसडवा व दारू बनवण्याचे साहित्य नष्ट केले आहे.

काटली-मोहझरी जंगल परिसरात दोन्ही गावातील दारू विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात मोहसडवा टाकला होता. जंगल परिसरात महिलांनी शोध मोहीम राबवली असतात त्यांना सात ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोहसडवा आढळून आला.  महिलांनी दारू विक्रेत्यांचा ४ लाख ८७ पोते मोहसडवा जंगलातच नष्ट केला. महिलांनी केलेल्या अहिंसक कृतीमुळे दारू विक्रेत्यांना चांगलाच फटका बसला आहे. अहिंसक कृती करून गावात प्रवेश करत एका दारू विक्रेत्यांनी गाव संघटनेच्या महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. महिलेच्या तक्रारीवरून शिवीगाळ करणाऱ्या वर २९४, ५०४, ३२३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात दारु गाडून विक्री केली जाते. या दारु विक्रेत्यावर पोलिसांनी कार्यवाही करावी अशी मागणी गाव संघटनेच्या महिलांनी केली आहे.
close