shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.अरूणा केंद्रे (दहीफळे) यांची लोखंडी सावरगाव येथे वैद्यकीय अधिक्षक पदी पदोन्नती..!!

केज । प्रतिनिधी: (प्रकाश मुंडे):- 
केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शल्यचिकित्सक व प्रभारी वैद्यकीय अधिक्षक म्हणून काम पहात असणाऱ्या डॉ. अरूणा केंद्रे (दहीफळे) यांची लोखंडे सावरगाव येथे स्त्री रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक वर्ग.१ पदी पदोन्नती झाली आहे.


केज येथील आदर्श पत्रकार समितीने त्यांना वैद्यकीय आदर्श सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

डाँ. डी. वाय. पाटील महीला वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे एमबीबीएस पदवी प्राप्त करून डॉ. अरूणा केंद्रे या नोव्हेंबर २००४ मध्ये शासकीय वैद्यकीय सेवेत त्या रुजू झाल्या, २००९ वैद्यकीय अधिकारी गट अ- पदासाठी लोकसेवा आयोगाकडून सेवा नियमित,स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय मधून शल्यचिकित्सा विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून सप्टेंबर २०१४ पासून उपजिल्हा रुग्णालय केज येथे आजपर्यंत रुग्णांची अविरत सेवा करताना गरोदर महीला तपासणी, डिलिव्हरी, सर्जरी अशा विविध प्रकारचे रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले शिवाइ आपले कर्तव्य चोख बजाऊन केज तालुक्यात डॉ. अरूणा केंद्रे(दहीफळे) यांनी आपले नाव लौकिक केले आहे. 

उपजिल्हा रुग्णालय केज येथे जवळपास सहा वर्षे वैद्यकीय सेवा केल्या नंतर पदोन्नतीवर  वैद्यकीय अधीक्षक वर्ग..१ पदावर  स्त्री रूग्णालय लोखंडी सावरगाव येथे नियुक्त झाल्या आहेत. त्यांच्या या पदोन्नतीमुळे केज तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, नेतेमंडळी, रूग्णाचे नातेसंबंधी, पत्रकार यांनी डॉ. अरूणा केंद्रे यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
close