हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२७,काँग्रेसचे नेते गुजरातचे काँग्रेस प्रभारी खा.राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२७ सप्टेंबर रविवार रोजी सेनगांव तालुक्यातील पुसेगांव येथे आशा वर्कर यांना साडी-चोळीचे वाटप करण्यात आले.
देशाचे काँग्रेस नेते गुजरात,दादरा नगर व दमन दीवचे काँग्रेस प्रभारी तथा खासदार राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना कोविड-१९ काळामध्ये आशा वर्कर आणि सुपरवायझर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे कोरोना योध्दा म्हणुन सेनगांव तालुका काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला व यावेळी त्यांना माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख यांच्या हस्ते साडी-चोळीचे वाटप करण्यात आले.यावेळी काँग्रेस नेते माजी जि.प.सदस्य विनायकराव देशमुख,पुसेगांवचे सरपंच नुरभाई,ज्ञानेश्वर धामणे,गजानन धुळे व गावकरी उपस्थित होते.

