संगमनेर:- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे प्राथमिक केंद्र अंतर्गत च्या निळवंडी येथील आरोग्य उपकेंद्रात महिला आरोग्य सेविकेची त्वरित नियुक्ती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन संगमनेर पंचायत समितीच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर. सुरेश घोलप, या दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिरडे यांनी दिनांक.२८-९-२०२० दिली निळवंडी आरोग्य केंद्रातील महिलेची बदली होऊन पुढे एक महिना लोटला अन्य कोणाची ही नियुक्ती करण्यात आली नाही.
त्यामुळे निळवंडी येथील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. निळवंडी आरोग्य उपकेंद्र त्वरित महिला आरोग्य सेविकेची नियुक्ती करावी अशा आश्याच्ये निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिरडे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर. सुरेश घोलप यांना दिली.
तशीच माहिती उकिरडे यांनी २८-९-२० ला दिली आहे.
व निळवंडी येथे लवकरात-लवकर आरोग्य उपकेंद्रात महिला आरोग्य सेविकेची नियुक्ती करावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिरडे यांनी केली आहे.
व निळवंडे च्या ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही म्हणून लवकरात लवकर महिला आरोग्य सेविकेची नियुक्ती करावी.

