इंदापूर । प्रतिनिधी तात्याराम पवार
श्रमिक पत्रकार संघाची इंदापूर तालुक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णकांत कोबलसरांच्या सुचने नुसार इंदापूर तालुक्यातील सभासद नोंदणी व अध्यक्ष निवडीची मिटिंग लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील भवानी गड (भवानी माता मंदिरा ) च्या आवारात घेण्यात आली होती.
यावेळी सभासद नोंदणी करून अध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात आली. या मध्ये अध्यक्ष पदासाठी एकमेव सुरेश श्रीहरी मिसाळ यांचे नाव सर्वानुमते पुढे आल्याने मिसाळ यांची इंदापूर तालुका अध्यक्ष पदि बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष निवडी नंतर अध्यक्ष तसेच उपस्थित सर्व सदस्याच्या एकमताने तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये तालुका उपाध्यक्ष पदि तात्यासाहेब घाटे, कार्याध्यक्ष पदि देवा राखुंडे,सचिव पदि सत्यजीत रणवरे, संघटक पदि शिवाजी पवार व प्रसिद्धी प्रमुख पदि विजय शिंदे यांची निवड करण्यात आली.
यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ. विकास शहा, संतोष दहिदुले, विश्व वारकरी सेना भारत पुणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब उगलमोगले,इम्तिहाज मुलाणी, प्रतापसिंग रजपुत, कैलास पवार,सचिन खुरंगे, आदि पत्रकार उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष सुरेश मिसाळ यांनी सांगितले की कृष्णकांत कोबलसरांच्या विचारांना अंगीकारुन त्यांच्या सुचना नुसार पुढील काळात वाटचाल करण्यात येईल. अध्यक्षांसह कार्यकारिणी मध्ये निवड झालेल्या सदस्याचा या वेळी सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर सर्व कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन भवानीगड लाखेवाडी येथे विश्व वारकरी सेना भारत पुणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब उगलमोगले, इम्तिहाज मुलाणी, सचिन खुरंगे यांनी केले.
सर्वांचे सत्कार ,आदरयुक्त कार्यक्रमाचं अतिशय सुंदर नियोजन केलं त्याबद्दल सर्वांनी ह्या सर्व आयोजक,नियोजक मंडळींचं आभार मानले.

