shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"एक मराठा,लाख मराठा" घोषणा देत सेनगांव तहसिलवर धडकला बैलगाडी मोर्चा..!!


हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२८,मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने आज २८ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी ११ वाजता सेनगांव तहसिल कार्यालयावर "एक मराठा लाख मराठा","आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोनाच्या बाप्पाचे" अशा गगनभेदी घोषणा देत बैलगाडी मोर्चा धडकला.

 

सर्वाच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज कमालीचा नाराज झाला असून मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्रात मराठा समाजाकडुन मोर्चे काढण्यात येत आहेत. याच अनुषंगाने मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने मराठा आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी सेनगांव तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता या बैलगाडी मोर्चास सेनगांव तालुक्यातील मराठा समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या मार्चात जवळपास ५० गाडी बैलाचा समावेश होता. हा मोर्चा सेनगांव शहरातील आप्पास्वामी प्रवेशव्दार पासुन सुरुवात झाली हा मोर्चा पोलीस स्टेशन,बसस्थानक मार्गे तहसिलवर धडकला.

या मोर्चाचे नेतृत्व मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिसे-पाटील यांनी केले.तहसिलदार जिवकुमार कांबळे यांना मराठा समाजाचे आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा शिवसैनिक सेनेचे सेनगांव तालुकाध्यक्ष बालासाहेब रघुनाथ भिसे-पाटील,पप्पु चव्हाण, शहराध्यक्ष महादेव मारोती हारण,अंकुश उर्फ पिंटु देशमुख,अंकुश तिडके,अमोल तिडके, मारोती गिते,नामदेव गिते, गजानन गिते,बंडु बांगर,दिनेश फासाटे,गजानन हारण यांच्यासह मराठा शिवसैनिक व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close