डॉ. विजय मकासरे यांचे राहुरी पोलीस स्टेशन चे पी. आय. मुकुंद देशमुख साहेब यांना अनावृत्त पत्र..!!
देवळाली(राहुरी)। प्रतिनिधी:
आदरणीय पी आय मुकुंद देशमुख साहेब,मी आपला खूप आदर करतो..आपले काम कदाचित चांगले असेल..एका वेळी आपण अनेक लोकांच्या मनासारखं काम करू शकत नाही ही गोष्ट ही मला मान्य आहे.. परंतु गेल्या काही दिवसांपासून आपल्या म्हणजे राहुरी पोलीस स्टेशन च्या विरोधात अनेक बातम्या मी पेपर ला वाचल्या..तेव्हा ही तुमच्या बद्दल मला थोडा सॉफ्ट कॉर्नर होता की कदाचित पत्रकार आणि तुमच्यात काही गैरसमज झाले असतील..
पण गेल्या काही दिवसांपासून मला तुमची एक गोष्ट खटकतेय जी मी तुम्हाला कधी बोलून दाखवली नाही.
साहेब वळण गावातील दारू बंदी हा विषय जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गाजत असताना १) आपण वळण मधील अवैध दारू विक्रेत्यांना तडीपार करू असं आश्वासन गावातील लोकांना दिलं होतं..त्याच काय झालं? २) आदरणीय मंत्री महोदय प्राजक्त तनपुरे यांनी वळण मध्ये दारू बंदी करा असे वरिष्ठांना सांगितले त्याची अंमल बजावणी का झाली नाही? ३) वळण मध्ये या दारू च्या वादातून उद्या एखादा खून झाला किंवा एखादी अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण ? कारण मी इथे गेल्या 8 दिवसापासून रोज दारुड्या लोकांची काठ्या लाठ्यानी भांडण, मारामाऱ्या,शिवीगाळ होताना बघतोय..५) काल आणि आज वळण येथील गावकर्यांनी दारू च्या दुकानावर मोठ्या प्रमाणात हल्लाबोल केला..नशीब दारू विक्रेता घरात लपून बसला..तो गावकऱ्यांच्या तावडीत सापडला असता आणि काही अनुचित घडले असते तर गावातील चांगल्या तरुणांना जे दारूबंदी साठी झटत आहेत.
त्यांना तुम्ही जेल मध्ये बसवले असते..६) साहेब असा काय फायदा आहे वळण मधली दारू सूरु ठेऊन.? ७) काल आणि आज वळणच्या दारू बंदी चा प्रश्न सगळ्या वृत्तपत्रांनी उचलून घेतला असताना ही अजूनही म्हणजे आज आणि आत्ता ही वळण ची दारू कोणासाठी,कशासाठी, कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे आम्हाला समजू द्या..?
साहेब मी आपला आदर करतो आणि हा आदर कायमचा मनात राहावा ही माझी एकच इच्छा आहे..कृपा करून वळण मधील दारू आणि अवैध धंदे बंद करा..नाहीतर येत्या 2 ऑक्टोबरला मी आपल्या पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करेल...!
आपला नम्र..
विजय मकासरे..
मो.8975400400

