shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगावात मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी एकाविरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल..!!



हिंगोली/प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख)
दि.१४,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरातील तेली समाजातील व्यक्तीच्या मृतदेहाची अवहेलना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या ठिकाणी अंत्यविधीला विरोध म्हणून जानीवपूर्वक हे कृत्य केल्याची माहिती मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी  दिली आहे.


विशेष म्हणजे सेनगाव शहराजवळच तेली समाजाची स्मशानभूमि आहे. आणि याच ठिकाणी आरोपीची जमीन सुध्दा आहे. या ठिकाणी तेली समाज अनेक वर्षांपासून अंत्यविधी करतात. परंतु येथे अंत्यविधी करण्यासाठी सदरील आरोपीचा याला विरोध आहे. या कारणाने अनेकदा यांच्यात वाद सुध्दा झाल्याची चर्चा ऐकायला मिळते. आता मात्र हा वाद तेली समाजाच्या मृतदेहाची अवहेलना करण्यापर्यंत पोहोचला आहे. शहरातील पांडुरंगआप्पा नामदेवआप्पा राऊत यांचा अंत्यविधि 12 सप्टेंबर रोजी पार पडला होता. अंत्यविधी पार पाडून मृताचे नातेवाईक घराकडे परतले. याचाच फायदा घेत तुकाराम फटांगळे याने पाण्याचा पाईप लाऊन अंत्यविधिच्या ठिकाणी जाणीवपूर्वक पाणी सोडले. यामुळे 13 सप्टेंबर रोजी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी सेनगाव पोलिस ठाणे गाठत तुकाराम परसराम फ़टांगळे यांच्या विरोधात मृत देहाची विटंबना करून भावना दुखावल्या बाबत कलम 301/2020 29क भादवी नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक हे करीत आहेत.
close