shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

योग्य वेळी कोवीड ॲम्बुलन्स भेटली असती तर रुग्ण वाचलाअसता... उपसभापती संजय देहाडे..!!

इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)➤
दिनांक १४/०९/२०२० रोजी इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत असलेले चित्तरंजन रॉय चौधरी यांना वेंटीलेटर बेड शिल्लक नसल्याने व बारामती येथे शिल्लक असलेल्या वेंटीलेटर बेड पर्यंत पोहोचवण्यास लागणारी  कोवीड ॲम्बुलन्स योग्यवेळी न मिळाल्याने सदर रुग्ण दगावला अशी माहिती इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी दिली ते पुढे म्हणाले की ,चित्तरंजन रॉय चौधरी कोरोना पॉझीटीव्ह आल्यावर भिगवण कोवीड सेटंर येथून ऑक्सीजन चे प्रमाण कमी आसल्याने व खासगी रूग्नालयात ऑक्सिजन बेड मीळत नसल्याने इंदापूर येथे उपजील्हा रूग्नालय या   ठीकाणी साधारण ११ तारखेला सकाळी ९ वाजता अॅडमीट केले व इंदापूर येथे उपचार चालू केले परंतू चार दिवसांनी तेथील डॉक्टरांनी सांगीतले रूग्नाला वेंटीलेटरची आवशकता भासत आहे तरी आपण जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकर जीथे वेंटीलेटर उपलब्ध होईल तीथे घेऊन जा असे म्हटले आम्ही त्यांना विचारले असता आपल्याकडे वेंटीलेटर उपलब्ध आहे का तर त्यांनी सांगीतले .

आपल्याकडे ६ वेंटीलेटर आहे व ते सर्व चालू आहेत त्या नंतर काल रात्री बारामती येथे एका बेडची पूष्टी झाल्या नंतर  रात्री पासून पहाटे  ५ वाजेपर्यंत १०८ ला कॉल करत होतो कारण ऑक्सीजनची गाडी लागत होती परंतू गाडी उशीरा आल्याने रूग्नाला पूढील उपचार देता आले नाही व ४५  वर्ष आसलेला तरूणाला त्याच्या मागे १२ व१४ वर्षाच्या दोन मुली ६ महीन्याचा मूलगा पत्नी व आई असा परीवार उघड्यावर पडला याला जबाबदार कोण  ? रूग्न दगावला आहे . जर अॅम्बूलन्स भेटली असती तर रूग्न वाचला असता .मी स्वत: रात्री ११:३० पासूण पहाटे ५:००पर्यंत १०८ ला कॉल करत होतो . माझ्या बरोबर संजय  काळे , प्रताप भोसले व सूधीर भोसले होते .
close