आंदोलकांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत बोंब ठोकून केला निषेध..!!
केज / तालुका प्रतिनिधी (प्रकाश मुंडे):-
केज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आरक्षण सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली.
या बाबतची माहिती अशी की, केज तहसील कार्यालयासमोर दि.१६ सप्टेंबर रोजी सकळ मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाचा मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी संतप्त आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करीत राज्यसरकाच्या विरोधात बोंब मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी तहसीलदारांना एक निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा संदर्भात दिलेला स्थगितीचा निर्णय हा दुर्दैवी असून आरक्षण सुरू ठेण्यासाठी राज्य शासना कडून पुन्नर याचिका दाखल करण्यात यावी.
अकरा सदस्यीपिठाची स्थापना करणे. आरक्षणाचा निर्णय होई पर्यंत नोकर भरती करू नये. मराठा समाजाचे रद्द करण्यात आलेले ई डब्ल्यू एस आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती सुरू ठेवाव्यात.नौकर भरतीत आरक्षण कायम ठेवावे या आणि अशा इतर दहा मागण्यांचा समावेश निवेदनात समावेश आहे.

