चंदन सावरगाव । प्रतिनिधी- (संजय इंगळे)दि. 22 रोजी कळम अंबा शिवारात ढगफुटी सदृश तुफानी वादळ व पावसाने अक्षरशः होत्याचे नव्हते करून टाकले व बळीराज्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.
काढणीला आलेले सोयाबीनचे पीक पाण्यात गेले, कापूस जमीनदोस्त झाला व ऊसाची अवस्था तर जणू निसर्गापुढे लोटांगण घेतल्यासारखी झाली आहे.
यामध्ये शशिकांत इंगळे, महारुद्र इंगळे, भास्कर इंगळे, मेघराज इंगळे, संतोष तपसे, सुरेंद्र काका तपसे, भानुदास इंगळे, बाळासाहेब इंगळे, इत्यादि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, तरी झालेल्या नुकसानीची पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

