इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
पिंपरी (खुर्द) - शिरसोडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी नुकत्याच झालेल्या उपसरपंच या पदाच्या निवडीमध्ये शिरसोडी गावचे श्री बाळासाहेब नरूटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यानिमित्त भाजपाचे युवा नेते पोपट कचरे यांनी त्यांचा श्रीफळ फेटा व हार घालून सत्कार केला .
यावेळी युवा नेते पोपट कचरे म्हणाले की बाळासाहेब नरुटे यांचा सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा स्वभाव व सर्वांच्या मदतीला धावणारे आणि सर्वांना आपलंसं करणारे या नेतृत्वाचे शिरसोडी ग्रामपंचायत च्या पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उपसरपंचपदी बिनविरोध निवड केली.
त्याबद्दल सर्वांचे आभार व बाळासाहेब नरूटे यांची उपसरपंचपदी निवड झाली म्हणून सर्व सहकाऱ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन करतो यावेळी या कार्यक्रमास युवा नेते श्री महिंद्र रेडके सौ. अश्विनी विजय पोळ सरपंच. श्री डोणगावे एम,एच ग्रामसेवक श्री विकास सांगवे पै प्रदिप बुटे श्री अनिल देव्हारे श्री धनाजी गोफणे श्री भंगवान बुटे श्री समाधान कोळे संतोष नरूटे बापु शेंडे राहुल नरूटे उपस्थित होते यावेळी नूतन उपसरपंच नरूटे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले की गावातील सर्वांगीण विकास करू व तसेच गावातील कामे लवकरात लवकर मार्गी लावू

