shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिनांक: २४ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल..!!

आज ६४४ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

-आतापर्यंत ३४ हजार ७६९ रुग्ण बरे होऊन परतले घरी

-रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७७टक्के

-आज ८४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर: जिल्ह्यात आज ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार ७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.७७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ८४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३७५० इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५८, राहाता ०१, श्रीरामपूर ०४, नेवासा ०२, श्रीगोंदा ०५, पारनेर ०२, अकोले ०३, राहुरी ०३, कोपरगाव ०३, जामखेड ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा  रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ६४४ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा १४४, संगमनेर २०, राहाता ४४, पाथर्डी ११, नगर ग्रा. १६, श्रीरामपूर ४१, कॅन्टोन्मेंट १७, नेवासा २३, श्रीगोंदा ३५, पारनेर ३७, अकोले ९८, राहुरी ३४, शेवगाव ४२, कोपरगाव ३२, जामखेड ३४,
कर्जत ०६, मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: ३४७६९

*उपचार सुरू असलेले रूग्ण:३७५०

*मृत्यू:६४७

*एकूण रूग्ण संख्या:३९१६६

*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

*माझे कुटुंब माझी जबाबदारी..
close