shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कॉंक्रिटीकरण व डाळिंब विक्री हॉलचे आ.विखे यांच्या हस्ते उद्घाटन..!!


सावळीविहीर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांना ,त्यांच्या वाहनांना पावसाच्या दलदलीमुळे येथील बाजार आवारात कोणतीही अडचण येऊ नये. म्हणून या बाजार समितीच्या आवारात संपूर्ण परिसर कॉंक्रिटीकरण करण्यात आला आहे. तसेच येथे डाळिंब मोठ्या प्रमाणात लिलावासाठी येत असून त्यासाठी डाळिंब विक्री सेल हॉल बनवण्यात आले असून  या डाळिंब विक्री सेलचे व काँक्रिटीकरणाचा लोकार्पण सोहळा शिर्डीचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते उद्घाटन करून आज दि.२४ गुरुवार रोजी संपन्न झाला. मास्क व सामाजिक दुरी चे  अंतर ठेवून हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांचेसह माजी आ. आणासाहेब म्हस्के पाटील,सभापती बापूसाहेब आहेर,पं स सभापती नंदा तांबे,गणेश कारखाना अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ,उपाध्यक्ष प्रतापरीव जगताप, ॲड. रघुनाथ बोठे,नगराध्यक्षा अर्चना कोते,उपसभापती वाल्मीकराव गोर्डे,सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके ,संचालक बाळासाहेब जनार्दन जपे तसेच अशोकराव श्रीपतराव जमधडे, आणि सर्व संचालक व सचिव उद्धव देवकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समिती ही अल्पावधीतच जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध अशी बाजार समिती झाली आहे.

येथे कांदा त्याचप्रमाणे डाळिंब खरेदी- विक्री मोठ्या प्रमाणात होत असते.येथे डाळिंबाला अधिक भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने येतात.त्यामुळे येथे डाळिंब विक्रीसाठी स्वतंत्र असे विक्री हॉल बनवण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारआवाराचा नगर-मनमाड  हायवे च्या लगत साकुरी शिवारात मोठा परिसर असून येथे पूर्वी पावसामुळे खूप दलदल व चिखल होत होता. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, हमाल या सर्वांना चिखलात वावरावे लागत होते. शिवाय शेतकऱ्यांचे शेतीमाल वाहनाने येत असल्यामुळे व व्यापारीही हा माल बाहेरगावी पाठवत असल्यामुळे जाणारे-येणारे वाहनांना येथे या दलदल, चिखलामुळे मोठी कसरत करावी लागत होती.

मात्र या कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार आवारातील संपूर्ण परिसर काँक्रिटीकरण केला आहे, अंडरग्राउंड गटारी केल्या आहेत. त्यामुळे हा परिसर स्वच्छ व अतिशय चांगला झाला आहे.या कॉंक्रिटीकरण व डाळिंब सेल हॉलचे उद्घाटन आज गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, सभासद, शेतकरी ,व्यापारी ,हमाल ,आदी सर्व उपस्थित होते.
close