shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुसळधार पावसाने बळीराजाच्या कष्टाचा बळी घेतला... शेताला तळ्यांचे स्वरूप..!!


संगमनेर :- पठार भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीसाठी अर्थ विनंती केली आहे. हजारो हेक्टरवरील शेती उध्वस्त झाल्याने खासदार व आमदारांनी लक्ष देण्याची गरज आहे. निसर्गाची अवकृपा, बाजारभाव, शेती पूरक साहित्यांची उपलब्धता अशा नाना वीध समस्या बळीराजाच्या पाची वर पुजल्या आहेत. कर्ज काढून फुलवलेल्या हजारो हेक्टरवरील शेती वरून राज्याच्या रुद्रावतारांनंतर काही क्षणांमध्ये उध्वस्त झाली. 

सुरूवातीला हुल दिलेल्या मान्सूनने शेवटच्या टप्प्यात जोरदार आगमन केल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. त्या मध्ये आधीच कोरोना संकटांनी बळीराजाचा बळी घेतला आहे. आता वरूण राजाने देखील मोठा धक्का दिल्यामुळे सर्व शेतकरी मायबाप सरकारकडे मदतीसाठी अर्थ विनंती  करता पठार भाग मध्ये १९ सप्टेंबरला आणि २२ सप्टेंबरला दुपारी वरून राजाचा रुद्रावतार पायला मिळाला. नाशिक-पुणे महामार्गावर पाणीच पाणी झाल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. तर या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांमध्ये पावसाचे पाणीच पाणी झाल्यामुळे पीके उद्ध्वस्त झाली. 

तर साठवलेल्या कांद्यालाही पावसाचा तडाखा बसला. याचबरोबर डाळिंब ,टोमॅटो, नगदी पिकांचे, मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणित बिघडून गेले बळीराजा मोठ्या संकटात सापडला. त्याला गरज आहे. प्रति मायबाप सरकारच्या मदतीची गरज आहे.  आर्थिक दृष्ट्या  खूप मोठे नुकसान झाले आहे. यात आमदार-खासदारांनी यात लवकरात लवकर लक्ष द्यावे.अशी शेतकरी वर्गाकडून आर्त हाक येत आहे.
close