shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोंडवाना विद्यापीठास युजीसीकडून १२- बी दर्जा प्राप्त..!!

 

गडचिरोली ता.२३ :- गोंडवाना विद्यापीठास
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून  १२ - बी दर्जा प्राप्त झाला आहे.  सन २०११ मध्ये स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाने १२ – बी चा दर्जा मिळविण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव आयोगाने मंजूर केला आहे. तसे परिपत्रक आज विद्यापीठास पाठविले आहे. 

हा दर्जा प्राप्त झाल्यामुळे विद्यापीठाचा सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत अनुदान प्राप्त करता येणार आहे. तसेच या दर्जामुळे विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयांना देखील आयोगाच्या विविध योजनांचा निधी प्राप्त होणार आहे. असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

श्री.सामंत म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना हा दर्जा मिळवून देऊ, असे विद्यापीठाला आश्वस्त केले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली असून यासाठी नगरविकासमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंद यांनी महत्वपूर्ण पाठपुरावा केला आहे.

विद्यापीठाला १२-बी चा दर्जा मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन श्री. सामंत यांनी अभिनंदन केले आहे.
close