shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी तातडीने देण्याचे सा.बां.मंत्री ना. चव्हाण यांचे आश्वासन - आ.विखे

सावळीविहीर (प्रतिनिधी) :
अहमदनगर ते मनमाड महामार्गाबाबत विशेष बैठक नुकतीच संपन्न झाली असुन या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने 40 कोटी रुपये मंजूर करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिली आहे.

नगर-मनमाड महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, या  महामार्गावरून प्रवास करतांना वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतं आहे. रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे पडले असून नेहमीच या रस्त्यावर अपघात होतं असतात. या अपघातात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. वाहनांचे देखील मोठे नुकसान होते. त्यामुळे या रस्त्याची लवकरात-लवकर दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा अनेक राजकीय पक्ष,तसेच सामाजिक संघटनांनी दिला होता.

असाच पध्दतीने भाजपचे नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर या प्रश्ना संदर्भात मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत  महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या मार्गाच्या तातडीच्या दुरूस्तीसाठी 40 कोटी रुपये  मंजूर करण्याची ग्वाही मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्याची माहिती माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिली.

या मार्गाच्या रूंदीकरण मजबूतीकरणासाठी नव्याने पुन्हा प्रस्ताव करतानाच या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी केंद्र सरकारकडे निधीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना विभागाचे सचिव आणि अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ,माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पा. यांच्यासह आ.आशुतोष काळे या बैठकीस उपस्थित होते.
close