shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सिन्नर ते शिर्डी या चार पदरी राष्ट्रीय राजमार्ग १६० ला मंजुरी..!!


सावळीविहीर( राजकुमार गडकरी) :
आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीला दर्शनासाठी मुंबई,गुजरात आदी भागातून येणाऱ्या साईभक्तांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे सिन्नर ते शिर्डी असा  चार पदरी महामार्ग मंजूर झाला असून या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 160 च्या रस्त्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.त्यामुळे साईभक्त व  परिसरातील नागरिकांमधून  मोठे समाधान व्यक्त होत आहे.हे काम मोंन्टे  कारलो कं ,लि,करत आहे.

 शिर्डी हे श्री साईबाबा मुळे देशात, विदेशात प्रसिद्ध झालेले असे तीर्थस्थान आहे, येथे लॉक डाऊन पूर्वी दररोज हजारो साईभक्त आपल्या वाहनांमधून शिर्डीला दर्शनासाठी येत होते व यानंतरही शिर्डीला हळूहळू साई भक्तांची संख्या येण्याची वाढणार आहे.साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी उघल्यानंतर येथे परत पूर्वीप्रमाणे हजारो साईभक्तांची वाहने येणार आहेत. मात्र नाशिक मुंबई आदि  भागातून येणाऱ्या साईभक्तांच्या वाहनांची संख्या अधिक आहे.

त्यामुळे सिन्नर ते सावळिविहीर फाटा दरम्यान सिंगल रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर साईभक्तांच्या वाहनांचा मोठा भार पडत होता, छोटे-मोठे अपघातही नेहमी होत होते. त्यामुळे सिन्नर ते सावळिविहीर फाटा दरम्यान या रस्त्याला रुंद करुन चार पदरी महामार्गची मंजुरी मिळाली असून सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून आता या रस्त्याचे काम जोमाने सुरु झाले आहे.हा चार पदरी महामार्ग  सिन्नर , कोपरगाव , राहता अशा तालुक्यातून जाणार आहे.

हा शिर्डी- सिन्नर चार पदरी महामार्ग सिन्नर येथे गुरेवाडी भागातून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गाला वळण रस्त्याने लागणार आहे. तसेच सिन्नर निघाल्यानंतर शिर्डीकडे नगर-मनमाड महामार्गाला सावळीवीर फाटा येथे हा मार्ग जॉईन होणार आहे.सिन्नर ते शिर्डी असा हा चार पदरी महामार्ग सुमारे 51 किलोमीटरचा आहे. सध्या हा दुपदरी मार्ग असून तो चार पदरी होणार आहे.सुमारे 22 मीटर या मार्गाची रुंदी राहणार असून 5.5 मीटर हा पालखी मार्ग या महामार्गालगत राहणार आहे. शिर्डीला साई भक्त मोठ्या प्रमाणात पायी पालखी घेऊन येत असतात. 

त्यांच्यासाठी हा स्वतंत्र पालखी मार्ग या रस्त्याच्या कडेने राहणार आहे. हा चार पदरी महामार्ग येत्या दोन वर्षात म्हणजे ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.या चार पदरी  महामार्गाचे काम  हायब्रीड  अॉन्युइटी मॉडेलच्या तत्वावर करण्यात येणार आहे.  बीओ,टी व टोल  नंतर हे  रस्ता बांधणीसाठी नवीन  योजना मॉडेल असून  या हायब्रीड ऑन्युइटी मध्ये  ठेकेदाराचा खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  टप्प्याटप्प्याने  ठेकेदाराला देते  व टोल वसुली मात्र  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण स्वतः वसुली करते, , सिन्नर ते सावळीवीहिर फाटा दरम्यान चार पदरी होणाऱ्या या रस्त्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरणाने 880 कोटीचे टेंडर काढले आहे, या रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 782 कोटी रुपये मंजूरही केले आहेत, हा सिन्नर सावळीविहीर रस्ता नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून जात आहे. 

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 19 गावे व अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव ,राहता तालुक्यातील एकूण 24 गावांमधील जमिनी या रस्त्यासाठी भू संपादित करण्यात आल्या आहेत.सध्याच्या या सिन्नर  ते सावळीविहीर फाटा दरम्यानच्या  रस्त्याच्या दुतर्फा असणारी लिंब, चिंच, आंबा ,बाभूळ आदी अनेक वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. अनेक  झाडे रस्त्याच्या कडेची तोडण्यात आली आहेत. तसेच जेसीबीने रस्त्याच्या दोन्ही बाजुला सपाटीकरण करण्यात येत आहे. रस्त्याचे रुंदीकरण होऊन हा रस्ता चार पदरी होणार आहे.मात्र सिन्नर ते सावळीविहीर फाटा या रस्त्याच्या दुतर्फा विविध झाडे होती, 

फळांची झाडे होती. त्यामुळे प्रदूषणही कमी होते. मात्र ही मोठाली झाडे तोडण्यात आली आहेत.त्यामुळे हा रस्ता आता सुनासुना वाटू लागला आहे. झाडे नसल्यामुळे धूळ व प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सध्या जरी जोमाने सुरू असले तरी या रस्त्याच्या नियोजित या चारपदरी रस्त्याच्या दुतर्फा आत्ताच संबंधित ठेकेदाराने किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्षारोपण करावे, जेणेकरून दोन-तीन वर्षात ही झाडे मोठाली होतील.

या महामार्गाचे काम होईपर्यंत झाडेही मोठाली होतील .असे नियोजन करून सिन्नर ते सावळीविहीर फाटा या दरम्यान या मार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करावे.अशी मागणी साईभक्त व नागरिकांनी केली आहे. हा सिन्नर सावळीविहीर फाटा दरम्यान चा महामार्ग चारपदरी होत असल्यामुळे व या रस्त्यालाच पादचारीसाठी  स्वतंत्र साई पालखी मार्ग ही होत असल्यामुळे साईभक्तांना मधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.
close