shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखेर आमदार शामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नाला यश ...!

-कंधार येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी 30 कोटी 88 लक्ष रुपयांच्या  कामास प्रशासकीय मान्यता..!

-पानशेवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी 11 कोटी 46 लक्ष रुपये कामास प्रशासकीय मान्यता.. !


लोहा : अशोक सोनकांबळे 
लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या वेळोवेळी मंत्रालय स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून कंधार येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी 30 कोटी 88 लक्ष रुपयाच्या कामाला शासनाने 18 सप्टेंबर रोजी च्या परिपत्रकानुसार मान्यता दिली असून कंधार तालुक्यातील पानशेवडी  येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारत बांधकामा साठी 11 कोटी 46 लक्ष रुपयाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळविण्यात आमदार शामसुंदर शिंदे यांना यश आले असल्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांचे बंधू तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

 यावेळी कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, उपसभापती अरुण पाटील कदम, युवा नेते रोहित पाटील शिंदे,  आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती .कंधार येथील उपजिल्हा रुग्णालयास सन 2012 मध्ये 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास शासनाने मान्यता दिली होती, ही मान्यता देऊन जवळपास सात वर्षाचा कालावधी लोटला गेला पण प्रत्यक्षात या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी व प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींची उदासीनता स्पष्ट होत असल्याचेही पत्रपरिषदेत रावसाहेब पाटील शिंदे यांनी सांगितले .

आमदार शामसुंदर शिंदे हे विकासाभिमुख नेतृत्व असून आपल्या आमदारकीच्या वर्षपूर्ती च्या अगोदर जनसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून कंधार येथील उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बांधकामासाठी 30 कोटी रुपयाचा निधी व पान शेवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी 11 कोटी 46 लाख रुपयांचा निधी खेचून आणण्यात वर्षपूर्ती अगोदरच आमदार शामसुंदर शिंदे यांना यश मिळाले असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

वेळोवेळी लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाविषयी आमदार शामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, युवा नेते रोहित पाटील शिंदे हे प्राधान्याने सोडवत असून कापूस खरेदी प्रश्नाविषयी वेळोवेळी आमदार श्यामसुंदर शिंदे  यांनी शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला होता ,कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावात खरेदी करण्यासाठी आमदार शिंदे यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून विशेष बाब म्हणून कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड शेतीमाल खरेदी केंद्र सुरू केले असून कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी 28 सप्टेंबर पासून कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार येथे नाव नोंदणी करून नाफेडच्या हमीभाव केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील शिंदे व कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, उपसभापती अरुण पाटील कदम यांनी केले आहे.

 आमदार शामसुंदर शिंदे यांनी कंधार तालुक्यातील वैद्यकीय सुविधे साठी एकूण 41 कोटी 46 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता मिळविण्यात यश मिळविले असल्याचेही यावेळी रावसाहेब पाटील शिंदे यांनी सांगितले .या पत्रकार परिषदेस युवा नेते रोहित पा. शिंदे, कंधार बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, उपसभापती अरुण पाटील कदम,शेरू भाई,बंटी गादेकर,अशोक सोनकांबळे,अवधूत पेठकर,सरपंच रमेश मोरे,सचिन पा. धानोरकर उपस्थित होते.
close