shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गडचिरोली : अस्वलाच्या हल्यात इसम गंभीर जखमी..!!

गडचिरोली(कुरखेडा) ता.१२ :- जंगलात मशरूम आणण्यासाठी  गेलेल्या इसमावर अस्वलाने हल्ला करून त्याला गंभीररित्या जखमी केले. ही घटना कुरखेडा वनपरिक्षेत्रांतर्गत गोठणगाव परिसरातील खैरी गावच्या जंगलात शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. गोविंदा राऊत(५०) रा. मालदुगी असेच जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.

यादव राऊत हे शुक्रवारी सकाळी गावानजीक असलेल्या खैरीच्या जंगलात मशरूम आणण्यासाठी गेले असतात त्यांच्यावर अस्वलाने अचानक प्राणघातक हल्ला केला. अस्वलाने त्यांच्या शहरावर नखाने ओरबडल्याने राऊत गंभीर रित्या जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचाराकरिता कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कुरखेडाचे वनपरिक्षेत्रधिकारी सुनील सोनटक्के यांनी जखमींची भेट घेऊन उपचारासाठी तत्काळ पाच हजार रुपयांची मदत दिली.
close