shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव पोलीस स्टेशनकडुन कोरोनावर मात करणा-या पोलीस अधिकार्‍यांचा सत्कार..!!



हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१२,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असेलेले पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव व ना.पो.काँ.सुभाष बांगर यांना कोरोनाची लागण झाली होती उपचार करून कोरोनावर मात केल्याने आज दि.१२ सप्टेंबर शनिवार रोजी सेनगांव पोलीस स्टेशनकडुन दोघांचे ही अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला आहे. 


सेनगांव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव व ना.पो.काँ.सुभाष बांगर हे कोरोनाच्या काळात बंदोबस्तासाठी दिवसरात्र झटत असतांना त्यांना ही पंधरा दिवसापुर्वी कोरोनाची लागण झाली होती.त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.औषधोपचार करुन बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली व आज ते सेनगांव पोलीस स्टेशनला कर्तव्यावर दाखल झाल्याने सेनगांव पोलीस स्टेशन कडुन त्यांचे अभिनंदन करुन पुष्पहार व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर,पोलीस उपनिरीक्षक अभयकुमार माखणे,जमादार अनिल भारती,पो.काँ.तुळशीराम वंजारे,महादु शिंदे,भिमराव चिंताळे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
close