सुशांत सिंह राजपुतच्या केसमध्ये ड्रग्स कनेक्शन सापडल्यानंतर NCB ने रियाला आणि तिच्या भावाला म्हणजे शौविक चक्रवर्तीला अटक केली आहे. रिया वारंवार सांगत होती की, तिने ड्रग्सचे सेवन केलेलं नाही. तिने यासाठी जामीन दाखल केली होती पण न्यायालयाने ती फेटाळून लावली.
सध्या सोशल मीडियावर रियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ती ड्रग्स घेताना दिसत आहे त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, ती खोटं बोलत आहे. आता तिचे पितळ उघडे पडले आहे.
या व्हीडिओमध्ये शूट करणारा व्यक्ती सुशांतला विचारतो हे चरस नाही आहे ? त्यावर सुशांत उत्तर देतो की नाही हे VFX आहे. व्हिज्युअल इफेक्ट म्हणजे कोणत्याही व्हिडिओत स्पेशल इफेक्ट्स टाकले जातात.
या व्हिडिओत सुशांत बोलत आहे की, हे ड्रग्स घेतल्यानंतर त्याला व्हिज्युअल इफेक्ट सारखे स्पेशल इफेक्ट असल्यासारखे वाटते. तेव्हाच रियाही म्हणते की, ही रोल सिगरेट आहे. हा व्हिडिओ कोणी बनवला आहे हे अजून समजू शकलेले नाही.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुशांत भजन गाताना दिसत आहे. नशेमध्ये तो आणि त्याचे साथीदार भजन गायला सुरुवात करतात. सुशांत चांगला गायकही होता. त्याला बऱ्याच वेळा गाताना पाहिले गेले आहे. तो शंकराचा भक्त होता. या व्हिडिओमध्ये रिया आणि सुशांत स्पष्टपणे ड्रग्स घेताना दिसत आहे.

