shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंगोली येथे १७ लाख ४७ हजारांच्या बनावट नोटासह २४ लाखांचा ऐवज पोलिसांकडून जप्त..!!



हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.३,हिंगोली शहरातील आनंद नगर अकोला बायपास भागातील एक पुरुष आणि महिला बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणत असल्याची गुप्त माहिती मिळाल्या वरून उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजने आणि दहशत वरोधी पथकाचे ओंमकांत चिंचोळकर यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल १७ लाख ४७ हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि ईतर मुद्देमाल एकुन २४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.


या बाबत एका आरोपीला अटक करण्यात आली असून महिला आरोपी फरार जाली आहें या बाबत हिंगोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या माहिती नुसार अकोला बायपास भागातील आनंदनगर येथें काही जन बनावट नोटा तयार करीत असल्याची माहिती हिंगोली पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून हिंगोली येथील शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजने आणि वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओंमकांत चिंचोळकर यांच्या पथकाने दि.२ सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटानी आरोपी भाड्याने राहत असलेल्या अरुण हणवते यांच्या घरी छापा टाकून या छाप्यात पोलिसांनी १७ लाख ४७ हजार ३५०रुपये व २० हजार रुपयाच्या खऱ्या नोटा आणि मशीन व ईतर नोटा बनवायचे साहित्य प्रिंटर १७ हजार ९४५ रुपये व एक चार चाकी गाडी  ६ लाख ४५ हजार रुपयाची गाडी असा एकुन २४ लाख ३० हजार ३४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहें व एका आरोपीला अटक करण्यात आली आहें  संतोष जगदेवराव सूर्यवंशी (देशमुख )या आरोपीला अटक करण्यात आली आहे ग्रामिण पोलिस स्टेशन हिंगोली येथे त्यांच्या विरुध्द व छायाबाई गुलाबराव भूक्तार यांच्या विरुध्द कलम ४८९ (अ),४८९(ब),४८९(क), ४८९(ड),४८९(ई ),४२०,३४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरील कारवाई हि उपविभागीय पोलीस  अधिकारी श्री वैजने साहेब दहशतवाद कक्ष हिंगोली यांच्या पथका मार्फत करण्यात आली आहे.
close