प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव 3 सप्टेंबर
औरंगाबाद -काल रात्री एक मुलगी आत्महत्या च्या तयारीत असल्याची माहिती दामिनी महिला सुरक्षा पथकास कळली तात्काळ पथक महावीर चौक च्या उड्डाणपुलावर पोहचले व मुलीशी चर्चा करून तिला ताब्यात घेऊन पालकांना संपर्क केला, घरगुती कारणामुळे मुलीनी टोकाचे पाऊल उचलेले असेल असे कळवले.
मुलींस पालकाच्या स्वाधीन केले, तिचा जीव वाचवला अशी उत्तम कामगिरी बद्दल पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी आजले मॅडम व टीमचा मा.सीपी चिरंजीव प्रसाद सरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

