shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरूतुल्य मुर्ती काळाच्या पडद्याआड... रमेश आडसकर..!!

केज / तालुका प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे):-  धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मुर्ती काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दांत भाजप नेते रमेश आडसकर यांनी लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज 

पुढे बोलताना भाजप नेते रमेश आडसकर शोकसंदेशात म्हणाले की , वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले.  विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम उभे केले. शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी  मार्गदर्शक असेच आहे.

रमेश आडसकर भाजप नेते


शिवाचार्य महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. महाराष्ट्रातील त्यांच्या अनुयायांना व आमच्या बीड जिल्ह्यातील अनुयायांना हे दुख्ख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवो असेही पुढे बोलताना भाजप नेते रमेश आडसकर म्हणाले . राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करून नेते रमेश आडसकर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.  केज व माजलगाव तालुक्यातही राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना मानणारा मोठ्या प्रमाणात अनुयायी वर्ग आहे. त्यांच्या या दुख्खात आम्ही सहभागी आहोत असे भाजप नेते रमेश आडसकर म्हणाले आहेत.
close