shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय सचिव पदावर रविंद्रदादा जाधव यांची नियुक्ती...!!



नाशिक खेडगांव (प्रतिनिधि) : दि.१ सप्टेंबर रोजी मानवाधिकार व्हाईस भारत सरकार अंतर्गत (न्यु.दिल्ली) रजी.नं. १६/२०१८ ची महत्वपूर्ण सभा राष्ट्रीय अध्यक्ष मा. उस्मान लखाने यांचे आदेशान्वये राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.सलिम शहा यांचे उपस्थितीत व प्रदेश अध्यक्ष मा. गुड्डभाई सैयद यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 

या वेळी HUMAN RIGHTS VOICO च्या "राष्ट्रीय सचिव" या महत्त्वपूर्ण पदावर अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश अध्यक्ष व रिपाईचे राज्य उपाध्यक्ष मा.रविंद्र दादा जाधव यांची नियुक्तीपत्र ओळखपत्र, शाल, गुलाबपुष्प देवुन राष्ट्रीय उपाध्यक्ष सलिम शहा यांचे हस्ते सन्मानित करुन पदग्रहण सभारंभ संपन्न झाला. सदर नियुक्तीपत्रावर राष्ट्रीय अध्यक्ष मा. उस्मान लखाने यांची स्वाक्षरी आहे.

 या प्रसंगी ह्युमन राईट व्हाईस च्या महाराष्ट्र प्रदेश संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खेडगांव ता.दिंडोरी या ठीकाणी मा.सलिम शहा व मा.रविंद्रदादा जाधव यांचे हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास मा.आमदार धनंजय हरिभाऊ महाले, मा  वसंतराव वाघ, मा.प्रदीप पगारे, मा. ए.टी.घोडेगाव, मा.राजेंद्र उफाडे, मा. विजय गांगुर्डे, मा.प्रमोद शिंदे, मा.प्रविण गांगुर्डे,  मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी दिवंगत लोकप्रिय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच धनंजय महाले , सलिम शहा, गुड्डभाई सैयद, या  मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक गुड्डभाई सैयद यांनी तर सूत्रसंचालन बाळासाहेब गांगुर्डे यांनी केले. आभार विजय गांगुर्डे यांनी मानले तर शेवटी राष्ट्रगितांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
close