shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कांदा उत्पादक शेतकरी हिताचे तागड मामा यांचा क्रांतीकारी निर्णय...!!

प्रतिनिधी । राधेश्याम कुसमुडे :
गेली पंधरा वीस वर्षांपुर्वी अहमदनगर जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी व्यापा-यांचे मोठमोठ्या पेढ्या होत्या त्या व्यापा-यांचे व शेतकरी यांचे दोन दोन पिढ्यांपासून संबंध असायचे आजोबा पासुन नातवा पर्यंत व्यवसायामुळे ॠणानुबंध तयार झाले होते त्या वेळी टेम्पो कमिशन हा प्रकार नव्हता अर्थात शेतक-यांचा कांदा आडतदारांकडे आणण्यासाठी वापरले जाणारे टेम्पो, ट्रक, पिकअप वाले. मागिल १५-२०  वर्षात शेतीचे प्रचंड उत्पादन वाढले.

 प्रत्येक तालुक्यात  नवनवीन मार्केट व आडतदार, व्यापारी तयार झाले पुर्वी शेतकरी आपली पेढी सोडुन दुस-या आडत्याकडे जाऊ नये म्हणून व्यापारी काळजी घ्यायचे त्याला चांगला भाव, वेळेवर पैसे द्यायचे व्यापारी शेतकरी एकमेकांच्या सुख दुःखात  सहभागी व्हायचे पंरतू अलिकडील काळात व्यवसायात अतिरिक्त स्पर्धा निर्माण झाली व्यवसाय वाढला पंरतू ज्या शेतक-याच्या जीवावर व्यवसाय चालतो त्याच शेतकरी बांधवांकडेच दुर्लक्ष व्हायला लागले शेतकरी आपला माल मार्केटयार्डमध्ये घेऊन जाण्यापोटी टेम्पोला भाडे देतो पंरतू व्यापारी टेम्पोवाल्यांना कांदा गोणी कमिशन द्यायला लागले टेम्पो वाल्यांना कमिशन दिले म्हणजे दुकानात कांदा विक्रीला आवक येते ही भावना आडत्यांमध्ये वाढली परिणामी जो शेतकरी काबाड कष्ट करून कांदा पिकवतो त्यांच्यकडे दुर्लक्ष होऊ लागले व्यापा-यांमध्ये टेम्पो, ट्रकांना कमिशन देण्याची स्पर्धा वाढली.

वास्तविक कांदा संबंधित प्रत्येक घटकांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवामुळेच पोटाची खळगी भरते त्यालाच कांदा भाव वाढून देण्याची स्पर्धा वाढायला हवी होती दुर्दैवाने ते घडत नाही कांदा पिकवणारा शेतकरीच उपेक्षित राहायला लागला. प्रसिद्ध  कांदा व्यापारी मा. सुदामराव तागड मामा व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे गेल्या ४० वर्षांपासून संबंध आहे आजपर्यंत कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला परिणाम स्वरूप अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये​ घोडेगाव येथील त्यांच्या आडत दुकानात महाराष्ट्रातील रेकार्डब्रेक नंबर एकची आवक असते.

महाराष्ट्रात एका दिवसात १००-१२५ ट्रक कांदा विक्रीचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. शेतक-यांना योग्य न्याय देण्यासाठी व शेतक-यांप्रती आत्मियता वाढावी यासाठी टेम्पो, ट्रकानां कमिशन  देणे बंद केले आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवाना आणखी जास्त भाव देणे सहजशक्य आहे असा त्यांना विश्वास आहे. 

शेतकर्‍यांचा तागड मामा या कांदा दुकानावर विश्वास आहे या विश्वासाच्या जोरावरच आम्ही हा महाराष्ट्रातील पहिला क्रांतीकारी शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे असे शिर्डी एक्सप्रेसशी बोलताना​ सांगत होते.   
                      
तागड मामा
कांदा आडतदार घोडेगाव कांदा मार्केट 
 ९४२२२२५५०९  ९७६४३०५५५५
close