shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यासिका सुरु करा उस्मानाबाद जिल्हा कार्यलयास निवेदन..!!



प्रतिनिधी । सचिन येडगे

उस्मानाबाद : शहरातील असलेली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यासिका उघडण्यास परवानगी मिळावी याकरीता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यासिका चे उस्मानाबाद जिल्ह्यातील संचालक वर्ग मा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा तरुण वर्ग हा जाणकार असल्या कारणाने हा वाढत्या कोरोनच्या महामारीच्या काळात प्रशासनाने दिलेली नियमावली प्रमाणे आम्ही वर्गामध्ये social distencing, मास्क, sanitizer, या साधनांचा वापर करू असा विश्वास उस्मानाबाद जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चे संचालक वर्ग यांनी दिला.

मागील मार्च २०२० पासून ते आजतागायत कोरोनच्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे सदर केंद्र सुरू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. Lockdown शिथिल होत असताना शासनाने टप्याटप्याने जवळपास सर्व व्यवसायांना परवानगी दिली . या सर्व विखळ्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि अभ्यासिका चे संचालक वर्ग यांना आर्थिक गोष्टीत आता अडचण भासू लागली आहे.

त्याकरिता आम्ही नियमांचे पालन करू आणि योग्य ती खबरदारी घेऊ त्यासाठी परवानगी देण्यात यावी , तसेच बंद असलेल्या सर्व कालावधीतील भाडे माफ करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले यावेळी  प्रा.बाजीराव जाधवर, प्रा.राहुल नाईकवाडी , प्रा.बाळकृष्ण साहेबराव उंबरे ,प्रा.सिद्धेश्वर मते, प्रा.बाळकृष्ण उंबरे  यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
close