सावळीविहीर(प्रतिनिधी):
राहाता तालुक्यात कोरेना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे तालुक्यातील विविध गावात कोरोनाच्या टेस्ट घेण्यात येत आहेत.आज गुरुवार 3 सप्टेंबर रोजी राहाता तालुक्यात दिवसभरात ठिक ठिकाणी एकूण 193 टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी एकुण 61 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
अशी माहिती राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.शिर्डीत आता एकूण सुमारे 292 कोरणा बाधित रुग्ण झाले आहे.तर राहता तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा 1000 च्या पुढे गेला आहे.अशी माहिती राहत्या चे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले आहे.
राहाता तालुक्यात दररोज कोरोनाच्या रॅपिड टेस्ट वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची तपासणी झटपट होत आहे व कोरोना बाधित रुग्ण त्वरित आढळून येत असून आज राहता तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 61 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या 61 कोरोना बाधित रुग्णांमध्ये राहाता येथे 6 कोरोणा बाधित रुग्ण आढळून आले तर शिर्डीत20 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.
तर लोणी खुर्द 3व लोणी बु,12 आणि पुणतांबा येथे 5,तर वाकडीला 6, सावळीविहिरला 2, बाभळेश्वरला 1 तर दाढ बु ला 1 कोरोणा बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ममदापूर, खडकेवाके, , पिंपरी निर्मळ, साकुरी , कोल्हार भगवतीपुर येथे प्रत्येकी 1कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. असे एकूण 61 कोरोना बाधित रुग्णआज दिनांक 3 सप्टेंबर गुरुवार रोजी नव्याने आढळून आले असल्याची माहिती राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.

