मुरूड प्रतिनिधी : विकास मेहेतर
अलिबाग - कोरोना वैश्विक महामारीमुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांना गरज भासल्यास तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी सदैव जनतेचा विचार करणारे व लोकांच्या मदतीसाठी नेहमी धावून येणारे अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार श्री.महेंद्रशेठ दळवी यांच्या पुढाकाराने रोहा तालुक्यासाठी रुग्णवाहिका लोकार्पित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री,युवासेना प्रमुख,शिवसेना नेते श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मानीय खासदार श्री.श्रीकांतजी शिंदे यांच्या सहकार्याने,अलिबाग मुरुडचे कार्यसम्राट आमदार श्री.महेंद्रशेठ दळवी यांच्या मागणीनुसार रुग्णवाहिकेचे लोकार्पण महाराष्ट्र राज्य नगरविकास मंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार श्री.महेंद्रशेठ दळवी यांनी शिवसेना रोहा तालुका प्रमुख श्री.समिरजी शेडगे यांना रूग्णवाहिकेची चावी देऊन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
सदर प्रसंगी माजी आमदार श्री.मनोहर भोईर , शिवसेना नेते श्री.संतोषजी निगडे, शिवसेना शहरप्रमुख श्री.रुपेश ठोंबरे आदी उपस्थित होते.

