shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वरखेडे गावाचे सुपुत्र जयंत कच्छवा यांनी परदेशात रोवला कर्तुत्वाचा झेंडा ...ऑस्ट्रेलिया निवडणूक आयोगाच्या प्रकल्प व्यवस्थापक पदी नियुक्ती..!!

प्रतिनिधी मंगल राजपुत :- 

वरखेडे :- अनेक देशांतील स्पर्धक होते. ब्रिटन ,जर्मनी,ऑस्ट्रेलिया या देशातील उमेदवार या पदाच्या शर्यतीत होते. मात्र या प्रक्रियेत ऑस्ट्रेलिया निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी भारतातील जयंत कच्छवा राजपुत यांची निवड जाहीर केली . स्थानिक व राज्य पातळीवर निवडणुकांचे नियोजन  व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे ताळमेळ लावणे तसेच माहिती तंत्रज्ञान विभागातील प्रणालीची देखरेख ऑस्ट्रेलियाने ठरवून दिलेले नियम व दिशानिर्देशनाचे पालन करण्याची जबाबदारी जयंत राजपूत हे निवडणूक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडतील. 

जयंत राजपूत यांचे मुळ गाव वरखेडे बु. ता.चाळीसगाव जि.जळगाव असून त्यांचे वडील बाबुसिंग कच्छवा हे स्टेट बँकेत सरव्यवस्थापक पदावर कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले व आता संध्या आपल्या निवासस्थानी वरखेडे येथे राहिलेले जीवन सुखी समाधानाने जगत आहेत. जयंत कच्छवा हे आधीपासूनच हुशार व अभ्यासु होते. त्यांना शिक्षणाची खुप आवड होती. अत्यंत गरीब व शेतकरी कुटुंबातील हे जयंत राजपूत यांनी आज आपल्या गावाचे तसेच देशाचे नाव परदेशात गाजवत आहेत.
close