केज / तालुका प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे):- लोकनेत्या पंकजाताई मुंडे ,यांचे निष्टवंत व खा.प्रीतमताई मुंडे,आ.नमीतताई मुंदडा यांचे विश्वासू कायम संघर्ष करणारे व वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक कार्यात , सक्रिय सहभागी असणारे डॉ वासुदेव यांची बीड जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.भाजपा युवा मोर्चा, भाजपा तालुका सरचिटणीस असे अनेक पदे त्यांनी भूषविले आहेत. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षजीवणात कायम सोबत व त्यांच्या तालमीत घडलेले ,सामाजिक,वैद्यकीय, शासकीय, कामाचा अनुभव असणारे, कायम संघर्ष करणारे व लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून सर्वत्र परिचित असणारे, केज तालुक्यात भाजपा पक्ष पडद्याआडुन सक्रिय ठेवणारे डॉ वासुदेव नेहरकर यांच्या निष्ठतेला न्याय मिळाला आहे.
सद्यस्थितीत नंदकिशोर मुंदडा यांच्या सोबत खांद्याला खांद्या लावून केज मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत सौ. नमिता मुंदडा यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत वाखाणण्याजोगी होती. केज मतदार संघातील एका निष्ठावान सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कार्यक्रत्याला मिळाला अशा प्रतिक्रिया सर्व सामान्य कार्यक्रते व जनते मधून व्यक्त होत आहेत. डॉ. वासुदेव नेहरकर यांचे क्रिडा शेत्रातील योगदान ही फार मोठे आहे.

