shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे-आ.तान्हाजीराव मुटकुळे..!!

हिंगोली । प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख)➤दि.२९,कोरोना या जागतिक महामारीच्या संकट काळात हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्त तुटवड्याने रुग्णाचे हाल होत आहेत.त्यामुळे सर्व नागरीकांनी रक्तदान करण्यास पुढे यावे असे आवाहन हिंगोली विधानसभेचे आ.तान्हाजीराव मुटकुळे यांनी केले आहे. 



दि.३० सप्टेंबर बुधवार रोजी सेनगांव येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजीत केले आहे.तर दि.०१ आँक्टोबंर गुरुवार रोजी हिंगोली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजीत केले आहे.रक्तदान हे श्रेष्ठदान ह्या प्रमाणे या शिबीरात जास्तीत जास्त भाजपा कार्यकर्त्यांनी व नागरीकांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कामात सहभागी व्हावे असे आवाहन आ.तान्हाजीराव मुटकुळे यांनी केले आहे.

close