हिंगोली। प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख)
दि.२९,गोर बंजारा कलावंतांना शासनाने ५० हजार रुपये आर्थिक मदत देणे व इतर मागण्यांचे निवेदन दि.२८ सप्टेंबर सोमवार रोजी आँल इंडिया गोर बंजारा कलावंत संघटनेच्या वतीने तहसिलदार जिवकुमार कांबळे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,पाच ते सहा महिन्यापासून कोरोना या महामारीने व लाँकडाऊनमुळे बंजारा भजने व इतर कार्यक्रम करुन पोटाची खळगी भरणारे गोर बंजारा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.तरी शासनाने या कलावंतांना ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी.तसेच गोर बंजारा कलावंतांना वयोवृद्ध कलावंत भत्ता द्यावा,गोर बंजारा कलावंताचे दुरदर्शन टिव्ही चँनलवर कार्यक्रम आयोजीत करावे,गोर बंजारा बोलीला भाषाचा दर्जामध्ये समावेश करावा,स्व.वंसतरावजी नाईक साहेब यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा,जलक्रांतीचे जनक संदर्भात जलसंपदा विभागाने दि.१२ जुन २०२० रोजी काढलेला वादग्रस्त,चुकीचा व श्रेय घेणारा अन्यायकारक शासन निर्णय तात्काळ रद्द करुन सुधारीत निर्णय घ्यावा. या निवेदनावर भगवान राठोड,अमोल राठोड,सुभाष राठोड,विश्वनाथ पवार,अशोक राठोड यांच्या स्वाक्ष-या आहेत.

